गुंडा विरोधी पथकाने लावला छडा
एमपीसी न्यूज – जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना मिळू नये यासाठी दररोज वेगवेगळ्या पोलीस (Chinchwad ) ठाण्याच्या हद्दीत जाऊन लपून छापून जुगार खेळण्याचा फंडा जुगरींनी सुरु केला. मात्र या नव्या फंड्याची माहिती काढून त्यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. 14 जणांवर कारवाई करत लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
जुगारींचा नवीन फंडा
जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई होत असल्याने पोलिसांना चकवा देऊन जुगार खेळण्यासाठी जुगरींनी नवीन फंडा शोधून काढला. यामध्ये व्हाटसअपवर जागा अथवा लॉज ठरवला जातो. त्यानंतर ठराविक, ओळखीचे जुगारी ठरलेल्या ठिकाणी येतात. नवीन उमेदवाराला सुरक्षेच्या कारणास्तव जुगार खेळायला घेतले जात नाही. तसेच नवीन व्यक्तीस ठरलेल्या ठिकाणाची माहिती देखील दिली जात नाही. ओळखीचे, ठराविक विश्वासू जुगारी निश्चित केले जातात. ते येताना यातील कोणीही स्वतःचे वाहन आणत नाही. हे सर्वजण रिक्षा, ओला, उबरने येतात.
Dehugaon : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
त्यातूनही अधिक खबरदारी म्हणून हे जुगारी दररोज पोलीस ठाण्याची हद्द बदलतात. त्यामुळे पोलिसांना एका ठिकाणाची माहिती मिळाली तर दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिथे काहीच हाती लागत नाही. लॉजमधील खोलीत जुगार सुरु असताना लॉजच्या, हॉटेलच्या बाहेर निगराणीसाठी एक व्यक्ती ठेवला जातो. पोलीस आल्याची चाहूल लागताच हा खबरी आतल्या सहकाऱ्यांना इशारा देतो आणि काही वेळेतच आतले जुगारी जुगाराचे बस्तान गुंडाळून काही घडलेच नाही, असे राहतात.
गुंडा विरोधी पथकाला सुगावा
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुंडा विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांना माहिती मिळाली की, मोई गाव परिसरात हॉटेल टॉप 49 येथे मयूर रानवडे हा काही लोकांना घेऊन जुगार खेळत आहे. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने हॉटेल मध्ये छापा मारून कारवाई केली.
मयूर नामदेव रानवडे (वय 32, रा. कासारवाडी) याच्या सांगण्यावरून इतर 12 लोक जुगार खेळत होते. त्यामुळे या 13 जणांवर तसेच जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा महेश गवारी (रा. मोई, ता. खेड) अशा एकूण 14 जणांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 7 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात (Chinchwad ) आला आहे.