एमपीसी न्यूज – कोरोना नंतर मंकी पॉक्स (M Pox) या आजाराने डोके वर काढले ( M Pox News) आहे. जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांमध्ये मंकी पॉक्सचा विषाणू पसरला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे हा विषाणू वेगाने पसरत आहे. सन 2022 मध्ये देखील मंकी पॉक्स वेगाने पसरू लागला होता. त्यावेळी केलेल्या उपाययोजनांमुळे तो आटोक्यात आला. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. आता पुन्हा मंकी पॉक्सचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तीन वर्षात दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
यावर्षी पसरलेल्या मंकी पॉक्सचा संसर्ग झालेल्यांची संख्या सर्वाधिक काँगो देशात आहे. इथे आजवर 14 हजार पेक्षा ( M Pox News) अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यातील 500 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्याला देखील याची लागण होत आहे. मंकी पॉक्सचा संसर्ग झाल्यानंतर अंगावरील पुरळ पूर्ण बरे होईपर्यंत इतरांपासून दूर राहावे. पुरळ बरे झाल्यानंतर देखील 12 आठवडे संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन WHO ने केले आहे.
मंकी पॉक्समुळे ताप, पुरळ, डोकेदुखी, अंगाला सूज येणे,पाठदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. संसर्गग्रस्त रुग्णाचे कपडे वापरले किंवा स्पर्श केल्यास, संसर्गाने आलेले फोड किंवा खपलीला स्पर्श केल्यास, बाधित ( M Pox News) व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकेतून, बाधित व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवल्यास याचा संसर्ग होत असल्याचे WHO ने म्हटले आहे.