एमपीसी न्यूज – मित्रांनीच मैत्रिणींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Pune ) करण्याची घटना घडली आहे.3 पैकी एका पिडीत विद्यार्थिनीच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 16 जून ते 30 जून दरम्यान पुण्यातील हडपसर भागातील असलेल्या एका नामांकित शाळेत घडला. पिडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले 2 विद्यार्थी हे इयत्ता दहावी मध्ये शिकत असून एकाच वर्गात आहेत. तर ताब्यात घेतलेला एक जण हा शाळा सोडून गेला असला तरी सुद्धा इतर मित्रांच्या संपर्कात होत असल्याची माहिती आहे.
वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मैत्रिणींचे फोटो टेलिग्राम या ॲपवर अपलोड करून त्याला न्यूड (Pune ) फोटोमध्ये मॉर्फ केले. या दोन विद्यार्थ्यांनी मॉर्फ केलेले फोटो शाळा सोडून गेलेल्या त्यांच्या मित्राला पाठवले. हा सगळा प्रकार शाळेतील एका शिक्षिकेला जेव्हा कळाला त्यावेळी त्यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना बोलून याबाबतची माहिती दिली
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना आज बाल न्याय मंडळात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांनी (Pune ) दिली.