एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 16 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – शुक्रवार.
तारीख – 16.08.2024.
शुभाशुभ विचार- 10 नंतर चांगला.
आज विशेष- पुत्रदा एकादशी.
राहू काळ – 10.00 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- मूळ 12.44 पर्यंत नंतर पूर्वाशाढा .
चंद्र राशी- धनु.
मेष ( शुभ रंग- भगवा)
आज व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करायला तुम्ही सज्ज असाल. काही समस्या आज वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील. आज तुमचा धार्मिकते कडे कल राहील.
वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
आज कुठेही आपल्या मर्यादेत राहिलेले बरे. धंद्यातील धाडसही आवाक्याबाहेर नको. वैवाहिक जीवनातही जोडीदारच जास्त हुशार असेच धोरण ठेवणे हिताचे राहील.
मिथुन (शुभ रंग – निळा)
नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीत तुमचा प्रभाव पडेल. दैनंदिन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. काही घरगुती समस्या जोडीदाराच्या मदतीने सुटतील.
कर्क ( शुभ रंग- जांभळा)
सहजच काही मिळेल अशा भ्रमात राहू नका. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना मात्र दैव निश्चित अनुकूल राहील. काही आर्थिक येणी आकस्मिकपणे वसूल होतील.
सिंह ( शुभ रंग- आकाशी)
स्टेशनरी, सौंदर्यप्रसाधने व चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय आज तेजीत चालतील. ऐश आरामी व विलासी वृत्ती वाढेल. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळी मौजमजा कराल.
कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
वास्तु किंवा वाहन खरेदी विक्रीच्या कामात अपेक्षित फायदा होईल. त्यासाठी कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतात. गृहिणीच्या कामाचे सासूबाईंकडून कौतुक होईल.
तूळ (शुभ रंग- राखाडी)
बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. शेजारी आपुलकीने डोकावतील. गृहिणी आज घर आवरण्याचे मनावरच घेतील. घराबाहेर व्यर्थ वाद टाळा. आईच्या आज्ञेत रहा.
वृश्चिक ( शुभ रंग- मोतिया)
आज तुमची परिस्थिती चांगली असल्याने मनस्थिती ही चांगलीच असेल. स्वतःच्या आवडीनिवडीवर खर्च करू शकाल. अति स्पष्टवक्तेपणा टाळा. शब्द जपून वापरा.
धनु (शुभ रंग- मरून)
आज हट्टीपणाला आवर घाला. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचे म्हणणेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवायला हवी. एखाद्या समारंभात तुम्ही आज इतरांचे लक्ष वेधून घ्याल.
मकर (शुभ रंग- मोरपिशी)
बेरोजगारांना घरापासून लांब ठिकाणी नोकरीच्या संधी येतील. उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाची स्वप्ने पडतील. आज दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
आनंदी व उत्साही असा दिवस असून काही दुरावलेली नाती आज जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नवीन घराचा ताबा मिळेल. तुमची काही स्वप्न साकार होतील.
मीन (शुभ रंग- डाळिंबी)
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवलेले बरे.