एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे छत्रछाया प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ( Akurdi ) भागातील पेपर, फुल, फळ, भाजीवाले, गटई (चांभार) यांना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. छत्री दिल्याबद्दल विक्रेत्यांनी रोटरीच्या सदस्यांचे आभार मानले.
रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे विविध समाज ऊपयोगी प्रकल्प राबविले जातात. त्याचाच छत्रछाया हा उपक्रम एक भाग आहे. छत्रीवाटपावेळी अध्यक्ष गौतम शहा, प्रकल्प अधिकारी रवी नामदे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, सुकन्या प्रकल्प संचालक साधना दातीर, सेवा प्रकल्प संचालक आनंदिता मुखर्जी, रोटरीएन अशोक मेहेर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Pune : कोलकता डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ आयमए पुणे यांच्यावतीने सेवा बंद आंदोलन
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला सोयी-सुविधा घराजवळ उपलब्ध करुन देण्यात छोट्या विक्रेत्यांचे मोठे योगदान आहे. हे विक्रेते रस्त्यावर उन्हातान्हात उभे राहून विक्री करतात. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, आकुर्डीतील मंडई, निगडी प्राधिकरणातील विक्रेत्यांना पेपर, फुल, फळ, भाजीवाले विक्रेते, गटई कामगारांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या छत्र्यांमुळे पाऊस, ऊन, वा-यापासून या विक्रेत्यांचे संरक्षण होईल, असे रोटरीचे अध्यक्ष गौतम शहा ( Akurdi ) म्हणाले.