एमपीसी न्यूज – अडीच लाखांच्या एमडी ड्रग्ससह (Baner)एका 34 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.15) म्हाळुंगे बाणेर येथे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.
कमलेश भगवान ससाणे (वय 34 रा. बालेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचा साथीदार नदीम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Shirur : बुद्धिबळ स्पर्धेत श्रेयश जाधवची जिल्हास्तरावर निवड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा म्हाळुंगे येथील अक्षय हॉटेल समोर एमडी हा अंमली पदार्थ विक्री करीता उभा होता. पोलिसांना याची बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून 30 हजार रुपयांचे दोन मोबाईल व 24 ग्रॅम वजनाचे एमडी हा अंमलीपदार्थ असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने हे अंमली पदार्थ नदीम याच्याकडून आणले होते. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.