एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाची आढावा बैठक दौंड येथे पार ( Maval )पडली. या बैठकीत कचरेवाडीच्या पोलीस पाटील मोनिका अंकुश कचरे पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. पुणे जिल्हा महिला अध्यक्ष हर्षदा संकपाळ यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी मोनिका कचरे पाटील यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब काळेभोर पाटील, महिला अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र तृप्तीताई मांडेकर,संपर्क प्रमुख अरुण केदारी, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लक्ष्मणराव शितोळे पाटील,खजिनदार महाराष्ट्र राज्य निलकंठ थोरात पाटील, गोरक्षनाथ नवले पाटील,सोनवणे पाटील,शेंडगे पाटील, हंडाळ पाटील, करपे पाटील, संजय जाधव, अनिल पडवळ पाटिल,राहुल आंबेकर पाटील, राजश्रीताई कचरे पाटील, पुजा परचंड पाटील, दातीर पाटील, सोनाली बोडके व इतर महाराष्ट्र राज्यातील व पुणे जिल्ह्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.
Pimpri : साम्यवाद आणि समतावाद हीच अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाची प्रेरणा – प्रभाकर ओव्हाळ
पुणे जिल्हा पोलिस पाटील संघ आढावा बैठक दौंड तालुका येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेत्रुत्वामध्ये खेळीमेळीमध्ये संपन्न झाली. मा. अध्यक्षा पुणे जिल्हा महिला हर्षदाताई संकपाळ यांचा कार्यकाळ संपल्याने , नवीन महिला पुणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मोनिका अंकुश कचरे पाटील यांची नुतन अध्यक्षपदी राज्याचे अध्यक्ष यांनी घोषणा केली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षा कचरे पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीने तालुक्यात त्यांचे कौतुक व सर्वत्र अभिनंदन होत ( Maval ) आहे.