एमपीसी न्यूज – नाशिक फाटा ते खेड दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू झाल्यानंतर शहरातील सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना वाहतूक कोंडीचा ( Pimpri) त्रास होवू नये. या करिता कामाच्या पहिल्या टप्प्यात जय गणेश साम्राज्य स्पाईन रोड, भारतमाता चौक मोशी आणि भोसरी येथील वाहतुकीला अडथळा होवू नये या करिता तीनही प्रस्तावित जंक्शन व सब-वेचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे या प्रकल्पासाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रकल्पाची माहिती देण्याकरिता महापालिका भवन येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रोजेक्ट मॅनेजर संजय कदम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Pimpri : स्वप्न साकारण्यासाठी योग्य मार्गदर्शन, अथक परिश्रमांची गरज – रवीन नायर
प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, कामला गती देण्यासाठी महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी NHAI च्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. भोसरी, तळवडे, चिखली, मोशी याभागातील वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने अंडरपास आणि सब-वे तसेच, भोसरीत भैरवनाथ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेय या ठिकाणी विद्यार्थी-पालकांच्या सोयीकरिता अंडरपासची व्यवस्था करावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली ( Pimpri) आहे.
नाशिक फाटा ते खेड या 32 किलोमीटर लांबीच्या एलिव्हेडेट कॉरिडॉरमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल. तसेच, शहरातील तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार आहे. काम सुरू असतानाही नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये. या करिता प्रशासनाने सर्व उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली आहे.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.