एमपीसी न्यूज – गणरायाच्या आगमनाला अवघे (Pune) काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी आता सर्वांचीच लगबग सुरु झाली आहे. नव्या रुपातील, नव्या ढंगातील गणेश मूर्ती देखील बाजारात दाखल झाल्या आहेत. यावेळी रामलल्लाच्या रुपातील गणेश मूर्तीला पसंती मिळत आहे. मात्र यंदा गणेशमूर्तींचे दर हे 10 टक्क्यांनी वधारले आहे.
यावेळी नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तींना पसंती मिळत आहे यावेळी मार्केटमध्ये लाल मातीच्या, शाडू मातीच्या पीओपीच्या मूर्ती आल्या आहेत. यामध्ये बालगणेश , देवी-देवतांच्या अवतारातील किंवा त्यांच्या सानिध्यातील मूर्ती आल्या आहेत. यामध्ये जसा आकार व मूर्तीतील कलाकुसर वाढेल तसा मूर्तीचा दर वाढत आहे. कच्चा माल व भाडे दर वाढल्याने मूर्तींच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
Pimpri : कोलकता घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा मूक मोर्चा
यामध्ये 500 रुपयांपासून मुर्तींच्या दराला सुरुवात होत असून 500 रुपयांमध्ये सहा ते सात इंची मुर्ती उपलब्ध होत आहे तर अडीच हजारांमध्ये मध्यम ते मोठी अकारांची गणपती मिळत आहे. रामलल्लाच्या मुर्ती या तीन हजारांपर्यंत गेल्या आहेत. मंडळाच्या मुर्तींचे दर हे 8 ते दहा हजाररुपयांपर्यंत गेले आहेत. यामध्ये गणपतीच्या ड्रेपरीचे दरदेखील वेगळे लागणार आहेत.यंदा इको फ्रेन्डली गणपती ना पसंती मिळत असून 70 टक्के मागणी ही शाडू मुर्तींना आहे. मात्र मागणीच्या तुलनेत शाडू माती कमी असल्याने शाडू मुर्तीचे दर देखील 10 टक्के नी वाढले आहेत.
मुर्तींच्या दराविषयी बोलताना गणेश मुर्ती विक्रेते मिलींद ओव्हाळ म्हणाले की, यावेळी माती चे दर, जागेचा मांडवाचे भाडे, मुर्ती कारागिराचा भत्ता असे सारेच दर वाढल्याने मुर्तीच्या दरामध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे दरामध्ये मुर्तीच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. मात्र आम्ही शक्य तेवढ्या कमी दराने मुर्ती ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत.
यावेळी दर वाढले असले तरी भक्तांची आस्था मात्र कमी झालेली नाही. भक्तेतेवढ्याच आवडीने व आस्थेने खरेदीले येत असल्याचे चित्र आहे.