एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 17 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – शनिवार.
तारीख – 17.08.2024.
शुभाशुभ विचार- क्षय तिथी.
आज विशेष- शनिप्रदोष.
राहू काळ – 09.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- पूर्वाशाढा 11.49 पर्यंत नंतर उत्तराशाढा.
चंद्र राशी- धनु 17.29 पर्यंत नंतर मकर.
मेष ( शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात डोक्याला ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जितके विचारतील तितकेच सांगा. फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत. सामान्य दिवस आहे.
मिथुन (शुभ रंग – चंदेरी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. भागीदारीत देण्याघेण्याचे व्यवहार चोख असलेले बरे.
कर्क ( शुभ रंग- आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामातील समर्पणाने वरिष्ठ प्रभावित होतील. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषयच काढू नका. काही येणी असतील तर ती मागितल्यावर मिळतील.
सिंह ( शुभ रंग- मोरपंखी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीला आज दैवाची उत्तम साथ लाभेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.
कन्या (शुभ रंग- भगवा)
व्यापार उद्योगाला चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहणार आहात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री फायद्यात राहील. आज घर सजावटीला प्राधान्य द्याल.
तूळ (शुभ रंग- पांढरा)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही आज नुकसानाला कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा.
वृश्चिक ( शुभ रंग- मोतिया)
आज तुम्ही आर्थिक व्यवहारात सावध असणे आवश्यक आहे. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवला तरीही पैशाची उणीव भासणार नाही. दंत वैद्याची भेट घ्यावी लागणार आहे.
धनु (शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर करू नका. इतरांच्या भानगडीत डोकावू नका.
मकर (शुभ रंग- लाल)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकललेले बरे. ज्येष्ठांना मनःशांतीसाठी सत्संगा शिवाय पर्याय नाही.
कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा विरोध मावळेल. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मोठा भाऊ आज तुम्हाला योग्य सल्ला देईल.
मीन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे आज गती घेतील.