Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 7:08 pm

MPC news

Chakan :मोठ्या आकाराचे मिरगल व कटला मासे बाजारात

एमपीसीन्यूज – खेड तालुक्यात (Chakan )धरणांमध्ये मोठ्या अकराचे मासे मिळून येत आहे. धरणातील विसर्गानंतर मोठे मासे मिळू लागले आहेत. तब्बल १० ते 12 किलोंचे कटला मासे व 3 ते 4 किलो वजनाचे मीरगल मासे मच्छिमार बांधवांच्या हाती लागत आहेत. श्रावण महिन्यात अनेकांना मांसाहार वर्ज असतो; मात्र अनेक खवय्ये श्रावणात देखील हे मासे खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

चाकण येथील आदिवासी मासेमारी करणाऱ्या बांधवानी सांगितले कि, सध्या दहा ते बारा किलो वजनाचे कटला मासे मोठ्या प्रमाणावर मिळून येत आहेत. सध्या श्रावण सुरु असला तरी श्रावणात मांसाहार करणाऱ्या खेड तालुक्यातील आणि चाकण परिसरातील खास खवय्यांची या माशांना मोठी मागणी आहे. ३०० रुपये किलो दराने कटला माशाची विक्री होत आहे. अत्यंत चवदार असलेल्या या माशाच्या खरेदीसाठी खास खवय्ये मंडळी आवर्जून चाकणच्या नेहरू चौकातील मच्छी मार्केट मध्ये हजेरी लावत आहेत.

Nazare Dam : नाझरे धरण 100 टक्के भरले

श्रावण असला तरी मांसाहार करणाऱ्या मंडळींची हे चवदार मासे खरेदीसाठी झुंबड उडत असल्याचे चित्र मच्छी मार्केट मध्ये पहावयास मिळत आहे. चाकण मधील मासे बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर मिरगळ मासे देखील विक्रीस येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मीरगल या माशांच्या पाठीवर तांबूस , नारंगी रंगाची झाक पहावयास मिळते. रहू माश्यापेक्षा अधिक चवदार मानल्या जाणार्या मिरगळ या माशाला श्रावणात देखील २५० रुपये एवढा किलोला भाव मिळत आहे. खेड तालुक्यातील भामाआसखेड , चासकमान धरणातून विसर्ग होताना चढणीला हे मासे मिळून येतात. मिरगाच्या चढणीचे मासे म्हणून देखील मीरगल माशाला ओळखले जाते असे मासेमार बांधव सांगतात. आरोग्यदायी आणि चवदार मासा म्हणून खवय्ये हे मासे आवर्जून खरेदी करताना दिसत आहेत.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर