एमपीसी न्यूज- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या(Talegaon Dabhade) नूतन महाराष्ट्र्र अभियांत्रिकीचे प्राध्यापक तसेच शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार या अभियांत्रिकी विभागातील सर्वोत्कृष्ट संशोधक आणि प्राध्यापक या श्रेणीत “सिंगापूर इंटरनॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड” हा नामांकित पुरस्कार सिंगापूर येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस) येथे इन्फिनिटी ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स प्रायव्हेट लिमिटेड संचालित ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरमतर्फे नुकतीच आंतरराष्ट्रीय परिषदेचे सिंगापूर येथे नुकतीच घेण्यात आली.
विद्यार्थी हा केंद्रस्थानी ठेऊन शिक्षक हा नेहमी विद्यार्थी घडवत असतो, विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती आणि गुणप्राप्ती दोन्ही मिळवून देत असतो, विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांची भविष्य निर्मिती करत असल्यामुळे उत्कृष्ट शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील प्राध्यापक या निकषातूनच आज हा पुरस्कार प्राप्त झाला असे मत डॉ. धवस यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी डॉ नितीन धवस यांचे अभिनंदन केले.