Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 9:07 am

MPC news

Wakad : उघड्या दरवाजावाटे रोख रकमेसह 89 हजारच्या वस्तू चोरीला

एमपीसी न्यूज – भर दिवसा अज्ञात चोरट्याने (Wakad) उघड्या दरवाजावाटे रोख रकमेसह 89 हजारच्या वस्तू चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सकाळी सहा ते दुपारी एक वाजताच्या कालावधीत अशोकनगर, ताथवडे येथे घडली.

विश्वदीप विश्वनाथ गाढवे (वय 24, रा. अशोकनगर, ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी 20 ऑगस्ट पर्यंत नोंदणीची संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वदीप हे त्यांच्या (Wakad) खोलीत झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरातून 40 हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, 200 रुपये किमतीचे पाकीट, 25 हजार रुपये रोख रक्कम, 20 हजार रुपये किमतीचे ॲपल कंपनीचे इयर पॉड, 4000 रुपये किमतीची पावर बॅंक असा एकूण 89 हजार 200 रुपये यांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर