एमपीसी न्यूज – आगामी विधानसभेची निवडणूक चिंचवडमधून लढविणार असल्याचे आम आदमी पक्षाचे ( Chinchwad) पदवीधर आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी जाहीर केल्यानंतर आता याच पक्षाचे रविराज काळे यांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आपमधील गटबाजी समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आयटी वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे. चिंचवड मतदारसंघात असंघटित कामगार, घरेलू कामगार यांचीही मोठी संख्या आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील सर्वच नागरिक प्रामाणिकपणे कर भरत आहेत. परंतु मतदारसंघात त्यांचा योग्य प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे ‘चिंचवडचा चेतन’ ही वेबसाईट लॉन्च करण्यात आली असून या कँम्पेनच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मांडले जाणार आहे. चिंचवडमधून निवडणूक लढविणार असल्याचे चेतन बेंद्रे यांनी सांगितले.
Pune: पुण्यातील बर्गर किंगने अमेरिकेतील बर्गर किंग काॅर्पोरेशन विरुद्ध न्यायालयीन लढाई जिंकली
त्यानंतर रविराज काळे यांनीही चिंचवडमधून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील निष्क्रिय नेत्यांमुळे चिंचवडचा विकास थांबला आहे. रस्ते, पाणी, वीज यासारखे मूलभूत प्रश्नदेखील आतापर्यंत सोडवले गेले नाहीत. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम आदमी पक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पक्ष आपल्याला उमेदवारी देईल ( Chinchwad) अशी खात्री असल्याचेही ते म्हणाले.