Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:29 pm

MPC news

Dehuroad : किरकोळ कारणावरून मारहाण; पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्यात गाडी घेऊन थांबला (Dehuroad) या कारणावरून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एम.बी. कॅम्प, देहूरोड येथे शनिवारी (दि. 17) दुपारी घडली.

विकास रामेर वाल्मिकी (वय 36, रा. मेन बाजार, देहूरोड) यांनी रविवारी (दि. 18) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजित रामकुमार, वेल्लु कलीमुर्ती चिन्नतंबी (वय 37, रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शरण बसप्पा यांच्यासह एम. बी. कॅम्प परिसरात थांबले होते.

त्यावेळी तिथे आलेल्या चार आरोपींनी रस्त्यात का गाडी घेऊन थांबला आहेस, असे म्हणत फिर्यादी यांना लाथा बुक्क्या आणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी विकास यांच्या तोंडावर बुक्की मारून दोन (Dehuroad) दात पाडले. तसेच फिर्यादी यांचा मावस भाऊ चेतन यास मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधी वेल्लू कली मुर्ती चिन्नतंबी (रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोसिांनी विकास रामेर वाल्मिकी आणि त्यांचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : अशोक सिंघल यांचे जीवन श्रीराममय होते – गोविंद शेंडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिया्रदी वेल्लू हे रस्त्याने जात असताना त्यांना फिर्यादी यांच्या पुतण्याचे भांडण सुरू असल्याचे दिसून आले. फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपी विकास याने शिवीगाळ करीत लाकडी काठीने फिर्यादी यांना मारहाण केली. तर दुस-या आरोपीने फिर्यादी व अजित यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर