Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 11:49 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Pimpri : पिंपरी मतदारसंघात दुबार ओळखपत्रांसह सात हजार नावे

एमपीसी न्यूज-   लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतसुध्दा मतदार यादीतील दुबार (Pimpri ) नावांचा घोळ कायम आहे. पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत तब्बल सात हजारांवर दुबार नावे असल्याचे पडताळणीत निदर्शनास आले आहे. अशा सर्व मतदारांना दुबार ओळखपत्र सुध्दा देण्यात आली आहेत. नियमानुसार कार्यवाही करून मतदार यादीतून दुबार नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे. निवडणूक विभागाकडे त्यासंदर्भात पुराव्यांसह तपशिलवार यादी   सादर केली आहे.    

राज्यातील विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर पर्यंत असल्याने नोव्हेंबरच्या मध्यावर मतदान होईल, असा अंदाज आहे. निवडणूक विभागाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाची  प्रारूप मतदार यादी तयार केली. 6 ऑगस्ट 2024 रोजी ती प्रसिद्ध करण्यात आली. मतदारयादीवर हरकत आणि सुचनेसाठी 19 ऑगस्ट ही अखेरची मुदत आहे. दरम्यान, यादीच्या तपासणीत अत्यंत गंभीर अशा त्रुटी आढळल्याचे सावळे यांनी निदर्शनास आणून दिले.

Sangvi : वाहने फोडणाऱ्या सराईत गुंडाची सांगवी पोलिसांनी काढली धिंड

याबबत लेखी पत्राद्वारे घेतलेल्या हरकती बद्दल माहिती देताना  सावळे म्हणाला कि, दोन किंवा तीनदा किंवा चार वेळा नोंदणी असलेल्या मतदारांकडे वेगवेगळ्या क्रमांकांची स्वतंत्र ओळखपत्रेही आहेत. त्यामुळे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद बनली आहे. तसेच अश्या प्रकारांमुळे लोकशाही धोक्यात येते. प्रारूप यादीमध्ये काही मतदारांची नावे त्याच यादीत दुबार नोंदविलेले आहे आणि अशा मतदारांना दुबार ओळखपत्र सुद्धा देण्यात आलेली आहेत. तर काही मतदारांची नावे लगतच्या भागातील इतर मतदार यादीत देखील नोंदविले असून त्याठिकाणी देखील मतदारांकडे दुबार ओळखपत्र देण्यात आलेली आहेत. तसेच काही मतदारांचे नाव  मतदारसंघातील  इतर भागात देखील नोंदविले असून आशा मतदारांना सुद्धा दुबार ओळखपत्र देण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी पुरुष मतदाराचे नावदुबार नोंदविले गेले असून एका ठिकाणी पुरुषाचा तर दुसऱ्या ठिकाणी महिलेचा फोटो लावण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या तरतुदीनुसार दुबार मतदार नोंदणी व दुबार ओळखपत्र असलेल्या मतदारांची नावे  आवश्यक ती  कायदेशीर  प्रक्रिया करून मतदार यादीतून  दुबार ओळखपत्र असलेली नावे तातडीने  वगळण्यात यावीत, अशी मागणी सीमा सावळेयांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे केली (Pimpri ) आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर