एमपीसी न्यूज – बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार ( Badlapur ) झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. 20 ऑगस्ट) हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले. तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरली, त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.
Pimpri : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी – काशिनाथ नखाते
सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता चिमुकल्यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे शाळेचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसले असून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे.
यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. तसेच आरोपींना लवकर शिक्षा मिळावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Badlapur ) म्हणाले.