एमपीसी न्यूज – मोई-चिखली रस्त्यावर हिट अँड रनची घटना (Chikhali)घडली. भरधाव स्कोर्पिओने पादचारी मजुराला जोरात धडक दिली. त्यानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता मोई गावच्या हद्दीत घडली.
सुरेश रामदास धनवटे (वय 38, रा. मोई, ता. खेड. मूळ रा. बुलढाणा) असे जखमी मजुराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्कोर्पिओ कार (एमएच 14/ईसी 2418) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhosari:दागिने खरेदीच्या बहाण्याने एक लाखाचे मंगळसूत्र पळवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई गावच्या हद्दीत मोई-चिखली रस्त्याने फिर्यादी सुरेश हे पायी चालत जात होते. ते इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोर आले असता भरधाव आलेल्या एका स्कोर्पिओने त्यांना धडक दिली. त्यामध्ये सुरेश यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर स्कोर्पिओ चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.