एमपीसी न्यूज – रक्षाबंधनाच्या (Chinchwad) सणासाठी पनवेल येथे राहणाऱ्या भावाकडे चिंचवड येथून निघालेल्या बहिणीच्या पर्समधून 3 लाख 90 हजारांचे दागिने आणि एक हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी साडेनऊ वाजता जयश्री टॉकीज समोर चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी 73 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Lonavala : लोणावळ्यात होणार जुन्या महामार्गाचे रुंदीकरण, ‘ओला- उबर’वर बंदी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chinchwad) महिलेचे भाऊ पनवेल येथे राहत आहेत. रक्षाबंधनाच्या सणासाठी त्या चिंचवड येथून पनवेल येथे जाण्यासाठी निघाल्या. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर जयश्री टॉकीज समोर चिंचवड येथे बसची वाट पाहत असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील पर्स मधून 3 लाख 90 हजारांचे दागिने आणि एक हजार रोख रक्कम चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.