एमपीसी न्यूज – जागेच्या भांडणातून पाच जणांनी 75 वर्षीय (Khed)नागरिकाला काठीने मारहाण केली आहे. हा सारा प्रकार रविवारी दुपारी चार वाजता आखतुली,खेड येथे घडला.
याप्रकरणी विष्णू आप्पाजी घोडे (वय 75 रा. आखतुली,खेड) यांनी एमआयडीसी महाळुंगे पोलीस ठाण्यात येथे फिर्यादी आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी पोपट दामू घुडे, तुषार शिवाजी घुडे,राघू नामदेव घूडे, ज्ञानेश्वर राघु घुडे, शिवाजी सिताराम घुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Bhosari : लग्नाची मागणी घालत महिलेचा विनयभंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी यांच्यात जागेवरून वाद आहे. याच वादाच्या कारणातून आरोपींनी शिवीगाळ करत वेळूच्या काठीने फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ चिंधू घुडे यांना मारहाण करत जखमी केली आहे. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.