एमपीसी न्यूज- ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार वडगाव मावळ येथील ज्येष्ठ नेते,मावळ तालुका भाजपाचे प्रभारी, मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांना जाहीर झाला आहे.
कोल्हापूर येथे रविवारी (दि. 25) दुपारी दोन वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. ग्राहक पंचायत अधिवेशनात कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हा सन्मान दिला जाणार आहे.
PCMC : शहरात वाहनांच्या संख्येत 16 टक्क्यांनी वाढ
हा पुरस्कार जाहीर झाल्याने भास्करराव आप्पा म्हाळसकर यांचे तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे.