एमपीसीन्यूज -बदलापूरच्या घटनेचे (Pune)पडसाद बदलापूरमध्ये उमटत असतानाच दुसरीकडे पुण्यात सुद्धा अशीच एक घटना घडली आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पुण्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भवानी पेठेत नामांकित शाळा आहे. या शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली असता आरोपी तरुणाने तिचा विनयभंग केला. पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत पळ काढला. घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार आईला सांगितला.तिच्या पालकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 19 वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
Dighi : दगडाने ठेचून खून? इंद्रायणी नदीत आढळला मृतदेह
पुण्याचे पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पुण्यातील भवानी पेठेत नामांकित शाळा आहे. त्याच शाळेतील दहावीत शिकणाऱ्या 19 वर्षीय आरोपी तरुणाने पीडितेच्या विनयभंग केल्याची तक्रार समर्थ पोलीस स्टेशला आली होती. त्यानुसार आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपस समर्थ पोलीस स्टेशन करत आहे.
पुण्यातील घटनेवर रूपाली चाकणकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे . त्या म्हणाल्या ,पुण्यातील ही घटना मला आत्ता समजली आहे, संबंधित आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. बदलापूर मधील घटना देखील संतापजनक आहे, महिला आयोगाने या गोष्टीची दखल घेतली आहे. गुन्हा दाखल करायला उशीर लावल्याने त्या पोलिसांना निलंबित केलं गेलं आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्यासाठी गृहमंत्री यांनी सूचना दिल्या आहेत.