Explore

Search
Close this search box.

Search

November 8, 2024 1:44 am

MPC news

Pune : टिंबर मार्केट परिसरात नालेसफाईला सुरुवात

एमपीसी न्यूज –  पुणे  शहराच्या पूर्व भागातील नागझरी नाल्यातील अतिक्रमणे आणि कचऱ्यामुळे टिंबर मार्केटमधील सुमारे 35 दुकानांत रविवारी झालेल्या ( Pune) पावसानंतर नाल्याचे पाणी शिरले . पावसाचे पाणी दुकानांत शिरल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर संतप्त व्यापाऱ्यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेने सोमवारी परिसरात नालेसफाईला सुरुवात केली.

रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे विविध भागांत पाणी साचले होते. नेहरू रस्त्यावरील सोनवणे रुग्णालयासमोर नागझरी नाल्यालगत काही अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडाला. पावसाचे पाणी वाहून बाण्यासाठी नाल्यातून जागा न मिळाल्याने ते पाणी टिंबर मार्केटमध्ये शिरले. रविवारमुळे बहुतांश दुकाने बंद होती. त्यामुळे सायंकाळनंतर दुकानांत पाणी शिरल्यावरच दुकानदारांना समजले. अनेक व्यापारी रात्रीच दुकानांमध्ये आल्यावर सुमारे दोन ते तीन फूट उंचीचे पाणी साठल्याचे दिसून आले. एमपीसी न्यूजने सर्वात पहील्यांदा याची दखल घेत या बातमीचा व्हीडीओ प्रसारीत केला होता.

Khed: जिन्याच्या दरवाजाद्वारे घरात घुसून सोने व रोख रक्कम लंपास 

दुकानांना पाण्याचा चांगलाच फटका बसला असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. टिंबर मार्केट असोसिएशनच्या अंदाजानुसार पावसाचे पाणी दुकानांत शिरल्यामुळे सुमारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी  टिंबर मार्केटमध्ये व्यापारी एकत्र झाले, त्यांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी त्या भागातील माजी नगरसेवक अविनाश बागवे, हेमंत रासने तसेच तुषार पाटील यांना बोलावून परिस्थिती दाखविली. त्यानंतर व्यापा-यांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय विमान वाहतू‌क आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भेटायला गेले. त्यांनी  महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला.  त्यांनी  त्यानंतर महापालिकेने नालेसफाई यांनी करण्यास प्रारंभ ( Pune)  केला.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर