Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 1:49 am

MPC news

Pune : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे येरवडा कारागृहातून पलायन

एमपीसी न्यूज –  खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत ( Pune ) असलेल्या एका कैद्याने पलायन केल्याचा प्रकार 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आला आहे. राजू पंढरीनाथ दुसाने (वय 43, मु पो महालगाव, ता वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. तुरुंग पोलीस शिपाई अविनाश पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू पंढरीनाथ दुसाने याला 2015 साली वारजे माळवाडी परिसरात झालेल्या एका खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणात त्याला फेब्रुवारी 2021 मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. 2019 ऑगस्ट रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे येरवडा कारागृहातील कैद्यांची संख्या मोजणी सुरु ( Pune)  होती. यावेळी राजू दुसाने हा सापडला नाही. त्यानंतर संपूर्ण कारागृहात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेही आढळला नाही.

Maharashtra Police Recruitment : खुशखबर! डिसेंबरमध्ये आणखी साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती 

त्यामुळे अखेर कैदी क्रमांक 1056 राजू पंढरीनाथ दुसाने हा शिक्षा भोगत असताना खुल्या कारागृहातून पळून गेल्याचे निदर्शनास आले. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाय करत ( Pune ) आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर