Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 7:42 pm

MPC news

Traffic News : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर सोमवारी (दि. 19) मोठ्या प्रमाणात ( Traffic News) वाहतूक कोंडी झाली. पावसाची रिपरिप, खड्डेमय रस्ते, त्यात रस्त्यांवर वाढलेली वाहनांची संख्या यामुळे ही वाहतूक कोंडी झाली. अनेकांना तासंतास या कोंडीत अडकून पडावे लागले. 

 

दोन्ही शहरांच्या प्रवेशद्वारावर ही वाहतूक कोंडी पहायला मिळाली. मागील दोन दिवसांपासून शहर परिसरात पाऊस पडत आहे. प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर डागडूजी केली आहे. या खड्ड्यांमधून वाळू निघाली आहे. त्यामुळे रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे.

Maharashtra Police Recruitment : खुशखबर! डिसेंबरमध्ये आणखी साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती 

 

सोमवारी राखी पौर्णिमेचा सण होता. त्यापूर्वी शनिवार, रविवार अशा लागून सुट्ट्या आल्याने अनेकांनी घरातून बाहेर पडणे पसंत केले. सोमवारी रात्री सर्वजण घराकडे परतत होते. त्यामुळे सोमवारी रात्री रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

 

पिंपरी चिंचवड शहरात येणारा जुना पुणे मुंबई महामार्ग, मुंबई बेंगलोर महामार्ग, पुणे नाशिक महामार्ग या ( Traffic News) रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. तर पुणे शहरात येणाऱ्या नगर रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर