एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो बुधवार (दि. 21) पासून येरवडा (Yerawada Metro Station) मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल होत आहे. बुधवार पासून सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत प्रवासी सेवा सुरु राहणार आहे. उद्यापासून हे स्थानक प्रवासी सेवेत दाखल झाल्यामुळे, वनाझ ते रामवाडी पर्यंतचा संपूर्ण विभाग (मार्गिका 2) पूर्णपणे कार्यान्वित होईल.
यामुळे येरवडा रहिवासी भाग उर्वरित मेट्रो नेटवर्कशी आणि पुणे शहराशी जोडला जाईल. यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, कर्मचारी वर्ग, येरवडा स्थानकाच्या जवळ असणाऱ्या आयटी हब मधील कर्मचारी आणि रहिवाशांच्या यांना फायदा होणार आहे. प्रवासी संख्या वाढवणे आणि पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे यासाठी या स्थानकाच्या प्रवासी सेवेचा उपयोग होणार आहे.
Kiwale : किवळेगाव स्मशानभूमीची दुरवस्था, आरसीसी शेड बांधा; शिवसेनेची मागणी
या स्थानकाची बाह्यरचना वैशिष्टपूर्ण आहे. स्थानकाचा दर्शनी भाग ऐतिहासिक दांडी मार्चपासून प्रेरित आहे, जो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. हे स्थानक केवळ एक महत्त्वाचा वाहतूक दुवा म्हणून काम करणार (Yerawada Metro Station) नाही तर आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देणारे आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना कार्यक्षम आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून येरवडा मेट्रो स्टेशन सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे”.