एमपीसी न्यूज : आळंदी येथे नवरा-बायकोच्या (Alandi) भांडणावरून एका महिलेने इंद्रायणी नदीत जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु एका तरुणाच्या आणि तेथील नागरिकांच्या प्रसंगवधानाने त्या महिलेचे प्राण वाचले.
सविस्तर माहिती अशी, की पालिका जवळील बस स्थानकाच्या येथे बाहेर गावावरून आलेल्या एका नवरा बायकोच्या जोडप्यांची भांडण झाली. त्या भांडणात महिलेने पुला वरून नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना आळंदीतील मारुती सोळंके या तरुण युवकाने व तेथील नागरिकांनी तिला उडी मारण्यास रोखले.
पुलाच्या जाळीवरून खाली त्या महिलेस सुरक्षित उतरवले. त्यामुळे (Alandi) पुढील दुर्घटना टळली. नंतर त्या महिलेस बसमध्ये बसून दिले. असे यावेळी मारुती सोळंके यांनी सांगितले. त्या महिलेला उडी मारण्याचे कारण विचारले असता तिने भांडण झाल्याच्या रागात उडी मारत असल्याचे सांगितले.