एमपीसी न्यूज – मनी लॉड्रींगच्या नावाखाली एका नागरिकाची 6 लाख 80 हजार रुपयांची (Chinchwad)फसवणूक करण्यात आली. ही घटना 24 जुलै ते 2 ऑगस्ट 2024 या कालावधीत रस्टन कॉलनी, चिंचवड येथे घडली.
याबाबत 48 वर्षीय नागरिकाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Chikhali: घरावर थाप मारल्याचा जाब विचारल्याने तरुणावर चाकुने वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फेडेक्स कुरिअर व मनी लॉड्रींग संबंधित पैसे भरण्यास सांगितले. स्काईप अॅपद्वारे फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल करीत कुरूयर व मनी लॉन्ड्रींग संबंधीत पैसे भरण्यास सांगून 6 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.