एमपीसी न्यूज – महिलेला वारंवार फ्रेंडशिपसाठी मागणी करत तिला अश्लिल मेसेज करून विनयभंग केला. ही घटना हिंजवडी येथे 19 आणि 20 ऑगस्ट रोजी हिंजवडी येथे घडली.
याप्रकरणी हिंजवडी येथे राहणा-या 29 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7620316636 या मोबाइल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chikhali : हप्त्याची मागणी करत अल्पवयीन मुलाचे अपहरण, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने स्पष्टपणे नकार देऊनही आरोपीने महिलेकडे वारंवार फ्रेंडशिपसाठी मागणी केली. तू खूप छान दिसतेस, मी तुला रोज बघतो, असे म्हणत महिलेला अश्लिल मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.