एमपीसी न्यूज – बसस्थानकावर महिलेच्या पर्समधून मधून सोन्याचे दागिने चोरीला (Sangvi)गेले आहेत. ही घटना स्वारगेट कडे जाणाऱ्या बसमध्ये सोमवारी (दि.19) घडली आहे.
याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chinchwad: मनी लॉड्रींगच्या बहाण्याने पावणे 7 लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बसमध्पे प्रवास करत असताना त्यांनी स्कार्फमध्ये गुंडाळून 61 हजार 250 रुपयांचे 17.5 ग्रॅम वजनाचे दागिने पर्समध्ये आणले होते. चोराने गर्दीचा फायदा घेत पर्समधून दागिने चोरून नेले आहेत. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.