एमपीसी न्यूज – चाकण औद्योगिक भागात सर्वच महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावरील अवजड वाहतूक नागरिकांच्या (Chakan)जीवावर उठली आहे. बेदरकार अवजड वाहन चालकांमुळे रस्त्यावरील अपघातांचे सिलसिला मागील काही वर्षांपासून अविरतपणे सुरूच आहे. त्यामुळे बहुतांश अपघात प्राणघातक अपघात ठरत आहेत. वाहन चालक गर्दीतून अत्यंत बेजबाबदारपणे रस्त्याने वाहने चालवत असल्याची बाब समोर येत आहे.
Alandi : तांत्रिक कारणामुळे आळंदी शहरात तब्बल साडेआठ तास वीज पुरवठा बंद; नागरिक हैराण
खराबवाडी येथे गुरुवारी (दि. २२ ऑगस्ट) सायंकाळी एका तरुणाला अवजड डंपर चालकाने अक्षरशः चिरडत नेले. प्रमोद गोपीचंद सोनकांबळे ( वय २५, सध्या रा. चाकण , मूळ रा. सोलापूर ) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चाकण एमआयडीसी मधील एका नामांकित कंपनीत नोकरीस होता.
रस्त्याच्या वर्षनुवर्ष रखडलेल्या कामांमुळे अपघात होतात. त्यामुळे या अपघातांना जबाबदार असणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची सामान्य जनतेची मागणी आहे.