Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 2:11 am

MPC news

Chikhali : रात्री उशिरा जेवण न दिल्याने हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेल बंद झाल्यानंतर रात्री उशिरा आलेल्या चौघांनी हॉटेल मधील वेटरला जेवण मागितले. जेवण संपले असून हॉटेल बंद झाल्याने वेटरने सांगितले. त्यानंतर वेटरने याबाबत माहिती दिल्यानंतर हॉटेल व्यावसायिक तिथे गेले असता त्यांना चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच तुझे हॉटेल कसे चालते तेच पाहतो, अशी धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री बारा वाजता देहू-चिखली रोडवर शेलारवस्ती येथील हॉटेल मार्तंड येथे घडली.

पप्पू शेलार, वैभव शेलार (दोघे रा. शेलारवस्ती, चिखली) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोविंद दगडू सातपुते (वय 42, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील 251 विद्यार्थ्यांना रोजगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे देहू-चिखली रस्त्यावर शेलारवस्ती येथे हॉटेल मार्तंड हे हॉटेल आहे. आरोपी मंगळवारी रात्री बारा वाजता हॉटेल मध्ये आले. त्यांनी वेटर लक्ष्मण याला जेवण मागितले. लक्ष्मण याने जेवण संपले असून हॉटेल बंद झाल्याचे आरोपींना सांगितले. त्यावरून आरोपींनी हॉटेल मधील वेटर लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत वेटर यांनी फिर्यादी सातपुते यांना माहिती दिली. सातपुते यांनी हॉटेल मध्ये जाऊन आरोपींना समजावून सांगितले.

त्यानंतर देखील आरोपींनी सातपुते यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. हॉटेल मधील खुर्ची सातपुते यांच्या पाठीत मारली. ‘तू कुठे जायचे तिथे जा. तुझे हॉटेल कसे चालते तेच पाहतो’ अशी आरोपींनी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

youtube.com/watch?v=sP-5Il_jHbI&t=321s

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर