एमपीसी न्यूज – हॉटेल व्यवसायात पैसे गुंतवल्यास तीन महिन्यात दुप्पट तर कन्स्ट्रक्शन व्यवसायात पैसे गुंतवल्यास 20 टक्के मोबदला ( Pimpri) देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची सात लाख 96 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जून 2020 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत चिखली आणि पिंपरी येथे घडली.
लंकेश हरिश्चंद्र निकम (वय 37, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राम ज्ञानदेव वाडेकर आणि एक महिला (दोघे रा. पिंपरीगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimpri : रेशन दुकानदाराला कोयत्याने मारण्याची धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकम यांचे सिंहगड रोड येथे चिकनचे दुकान आहे. आरोपींनी निकम आणि इतर लोकांना हॉटेल व्यवसायात पैसे गुंतवल्यास तीन महिन्यात दुप्पट रक्कम देतो. तसेच सिव्हील कन्स्ट्रक्शन व्यवसायात पैसे गुंतवल्यास 20 टक्के मोबदला देतो, असे आमिष दाखवले. त्यातून निकम आणि इतर लोकांकडून सात लाख 96 हजार 861 रुपये घेऊन क्कोन्तही मोबदला न देता त्यांची ( Pimpri) फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.