एमपीसी न्यूज – काल ( दिनांक 22 रोजी) आळंदी पोलीस स्टेशन येथे बदलापूर घटनेच्या ( Alandi) अनुषंगाने शाळा, कॉलेज मधील संस्थापक, प्राचार्य, शिक्षक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. उपस्थित शाळेच्या प्रतिनिधींना शाळा परिसरात सी. सी. टी. व्ही. बसवावेत, पालक सभा घ्याव्यात, स्कूल बस ड्रायव्हर तसेच इतर सर्व स्टाफचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणे, मुलांच्या सुरक्षितते संबंधी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, सखी सावित्री समितीची स्थापना करणे, तसेच मुलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने इतर खबरदारी घेणेबाबत योग्य त्या सूचना यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी एस नरके यांनी दिल्या. सदर बैठकीसाठी एकूण 22 शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच आळंदी नगरपरिषदचे अधिकारी सुद्धा उपस्थित ( Alandi) होते.