एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी (Chakan) करून एका ज्येष्ठ नागरिकाचे दागिने लुटून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 20 ) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास चाकण तळेगावर रस्त्यावर घडली.
प्रभाकर भिकु पोटे (वय 71, रा. नाणेकरवाडी ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत गुरूवारी (दि. 22 ) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास फिर्यादी पोटे हे चाकण तळेगाव रोडवर नातू शिवम पोटे यास आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन चोरटे आले. फिर्यादी प्रभाकर पोटे यांच्या जवळ येत त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगितले. खराबवाडीकडे दंगल सुरू आहे. एका शिक्षकाला आता खूप मारले आहे.
Chinchwad : सायन्स पार्कमध्ये ‘कल्पकघर’
त्यास दवाखान्यात ॲडमीट करुन आम्ही आलो आहे. ज्यांच्या अंगावर सोने आहे त्या व्यक्तीला मारहाण करुन त्यांचे सोने काढून घेत आहेत. तुमचे कडील गळयातील सोन्याची चेन व बोटातील अंगठी काढून द्या. आम्ही तुमचे दागिने सुरक्षित ठेवतो, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोन्याची चेन व अंगठी काढून दिली. त्यावेळी आरोपींनी दागिने एका कागदामध्ये गुंडाळले. थोडया वेळाने त्यांनी गुंडाळलेला कागद फिर्यादीचे हातामध्ये देऊन दुचाकीवरून निघून गेले.
फिर्यादी प्रभाकर पोटे यांनी हातात दिलेला कागद उघडन पाहिला असता त्यामध्ये फिर्यादीस दगडाचे खडे दिसले. चोरट्यांनी फिर्यादी पोटे यांचे 65 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.