Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 12:47 am

MPC news

Pune : पुणे महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेकडून माहिती अधिकार कार्यकर्त्याला चपलेने चोप

एमपीसी न्यूज –  माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची बतावणी करून विकासकामामध्ये ( Pune ) विनाकारण अडथळा आणत असल्याचा आरोप करून भाजपच्या माजी नगरसेविकेने गुरुवारी या कार्यकर्त्याला चपलेने चोप दिला. या घटनेने खळबळ उडाली. संबंधित व्यक्ती ही शहर काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या जवळची असल्याची चर्चा आहे.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर भागात आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका विशेष प्रयत्नशील आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत आहेत. वसतिगृहाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, अंतर्गत काम बाकी आहे.

Pune : पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार; हातोडीने वार करून गुंड गोट्या शेजवळचा खून

वसतिगृहाच्या शेवटच्या टप्प्यातील दोन कोटी रुपयांच्या कामाचे आदेश पालिकेने दिलेले नाहीत. हे कामाचे आदेश लवकर द्यावेत, यासाठी संबंधित माजी नगरसेविका महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. तेथे अधिकाऱ्याशी बोलत असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणविणारी ही व्यक्ती तेथे आली. त्या वेळी नगरसेविका आणि त्याची शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर चिडलेल्या नगरसेविकेने थेट या कार्यकर्त्याला चपलेनेच चोप दिला. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ महापालिकेच्या भवन विभागामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ( Pune ) होते.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर