एमपीसी न्यूज – भरधाव जाणाऱ्या वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या (Ravet) पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 21) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर रावेत येथे घडला.
रामलाल रामचलितर पंडो (वय 40, रा. किवळे. मूळ रा. छत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुदीप कुमार श्रीदेव कुमार (वय 24, रा. किवळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Talawade : 9 किलो गांजासह तरुणास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र रामलाल पंडो हे मुंबई बेंगलोर (Ravet) महामार्गावर रावेत येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या एका वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये रामलाल गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनेची माहिती न देता तसेच जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता वाहन चालक पळून गेला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.