Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 6:19 pm

MPC news

Today’s Horoscope 23 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 23 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 23.08.2024. 

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र- रेवती 19.54 पर्यंत नंतर अश्विनी.

चंद्र राशी- मीन 19.54  पर्यंत नंतर मेष.

—————————–

मेष ( शुभ रंग-स्ट्रॉबेरी )

नवीन व्यवसायात मोठे आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. ज्येष्ठ मंडळींनी खाण्यापिण्याची पथ्ये पाळायला हवीत. आज सत्संगातून मनःशांती लाभेल.

वृषभ (शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वाचा प्रभाव राहील. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आनंदी दिवस.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. वडीलधाऱ्यांची मते विचारात घ्या.

कर्क ( शुभ रंग-मरून)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. नोकरीच्या ठिकाणी बिनचूक कामास प्राधान्य द्यायला हवे. ज्येष्ठांनी प्रवासात आरोग्यास जपावे.

सिंह ( शुभ रंग- जांभळा)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही आज तब्येत थोडी नरमच राहील. जोडीदार जे म्हणेल त्यास होच म्हणणे हिताचे राहील.

कन्या (शुभ रंग- गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. पत्नीच आज तुम्हाला योग्य सल्ले देईल.

तूळ (शुभ रंग- पिस्ता)

आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. गृहिणी आज महागड्या वस्तूंची खरेदी करतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्नांती परमेश्वर.

वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा)

नोकरदार वरिष्ठांच्या मागे पुढे करतील. कलाकारांच्या प्रयत्नांना यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

धनु (शुभ रंग- आकाशी) 

घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल.  सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आनंदी व उत्साही दिवस. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

मकर (शुभ रंग- केशरी)

बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालावे लागेल. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

कुंभ ( शुभ रंग- लाल)

आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत मृदुता ठेवून अनेक किचकट प्रश्न मार्गी लावाल.

मीन (शुभ रंग- मोरपंखी) 

महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मताचा आग्रह धाराल. अति आत्मविश्वास आज नुकसानाला कारणीभूत ठरू शकेल. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा सुसंवाद गरजेचा आहे.

शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424
जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर