एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून पतीने पत्नी तसेच स्वतःच्या भावजयीला बेदम मारहाण केली आहे. ही घटना 17 (Khed)ऑगस्ट 2024 रोजी केळगाव खेड येथे घडली आहे.
याप्रकरणी 28 वर्षीय पिडितेने शुक्रवारी (दि.23) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश व्यंकट मुंगसे (वय 35 रा केळगाव, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Bhose :श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा तालुकास्तरीय खो – खो स्पर्धेत विजय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती निलेश याने फिर्यादी यांना व त्यांच्या भावजयीला लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच दोघीचे डोके भिंतीवर आपटून त्यांना गंभीर जखमी केले. त्यामध्ये फिर्यादी यांच्या आतड्याला सूज आली आहे. तर हे त्यांच्या भावजयीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे यावरून पती विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.