एमपीसी न्यूज – न्यायालयात सुरू असलेल्या वादाच्या कारणावरून पतीने पत्नीवर कोयत्याने वार केले आहेत ही घटना गुरुवारी (दि.22) सायंकाळी करंजविहीरे खेड( Mahalunge) येथे घडली.
याप्रकरणी संभाजी बबन कोळेकर ( वय 46 रा .करंजवहीरे खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी पती आतिश अंकुश मरगज (वय 30 रा. खेड) याला अटक केली आहे.
Today’s Horoscope 24 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुतणी निकिता मरगज (वय 26) ही आई-वडिलांकडे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होती. यावेळी आरोपी हा तिथे आला व त्याने पत्नीशी सुरू असलेल्या न्यायालयातील वादाच्या कारणावरून चिडून पत्नीच्या डोक्यावर, हातावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. यावरून एमआयडीसी महाळुंगे पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास ( Mahalunge) करत आहेत.