Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 7:03 am

MPC news

Nagpur : लाडकी बहीण योजना जास्त काळ चालणार नाही- राज ठाकरे

एमपीसीन्यूज – महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु आहे.या योजनेसाठी(Nagpur) महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचे पहिले दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमासुद्धा झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनीया योजनेसंदर्भात प्रथमच भाष्य केले आहे. राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे मतदान होईलच हे सांगता येणार नाही. ही योजना जास्त काळ चालणार नाही. दोन, तीन महिन्यांत ही योजना बंद होईल. सरकारकडे योजनेसाठी पैसे आहेत कुठे? लोकांना असे फुकटाचे पैसे नको आहेत. त्याऐवजी तुम्हा काम द्या.

नागपुरात बोलतांना ते म्हणाले ,मध्य प्रदेशात यश मिळाले ते केवळ लाडकी बहिणीमुळे मिळाले, असे नाही. त्याला इतरही कारणे असतील ना. पहिला आणि दुसरा महिना कदाचित दिला जाईल. त्यानंतर सरकारकडे पैसे कुठे आहेत. अजितदादांनीही सांगितले आहे की निवडून दिले तरच पहिल्या हप्त्याची सही असेल. लोक फुकटचे पैसे मागत नाही ते काम मागत आहेत. शेतकरी वीज मोफत मागत नाही. त्यांना त्या अखंड विजपुरवठा हवा आहे. आता जे पैसे दिले जात आहेत. तो लोकांचा कर आहे. राज्यात असंख्य नोकऱ्या आहेत. परंतु त्याची माहिती राज्यातील युवकांपर्यंत जात नाही. बाहेरच्या राज्यातील युवकांना कळते की महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षाचे परवाने दिले जात आहे. ही कोणती पद्धत आहे?

Maharashtra : मातंग समाजाच्या पारंपारीक कला, व्यवसायाला प्रोत्साहनाची गरज –  आमदार अमित गोरखे

ते पुढे म्हणाले ,लोक खूप हुशार आहेत. त्यांना पैसे मिळत असतील तर नक्की घेतील. पण मतदान करणार नाही. कोणी तरी मला सांगितले, की मतदानाच्या दिवशी कोल्हापुरात दरवाजावर पिशवी लावलेली असते. जेवढे मतदार तेवढे पैसे त्या पिशवीमध्ये ठेवलेले असतात. अशा तीनचार पिशव्या असतात. त्यामुळे कुणी कुणाला मतदान केले कसे कळणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर