एमपीसी न्यूज – काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पवना धरण परिसरात पावसाने (Pawna Dam ) हजेरी लावली असून धरण 99 टक्के भरले आहे. धरणात येणारा येवा विचारात घेता लवकरच पाणीसाठा 100% होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दुपारी दोन वाजल्यापासून 3500 क्युसेक वेगाने नदीत पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.
Maharashtra : मातंग समाजाच्या पारंपारीक कला, व्यवसायाला प्रोत्साहनाची गरज – आमदार अमित गोरखे
पवना धरण सद्यस्थितीत 99% भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झालेली आहे. धरणात येणारा येवा विचारात घेता लवकरच पाणीसाठा 100% होण्याची दाट शक्यता आहे.सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 क्युसेक्स इ त क्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू असून पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार दुपारी दोन वाजता सांडव्याद्वारे 2100 क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सांडव्यावरील विसर्गानंतर नदीपात्रामध्ये एकूण 3500 क्यूसेक्स (1400 + 2100 = 3500 क्यूसेक्स) इतका विसर्ग होणार आहे.
पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण (Pawna Dam ) कक्षाने केले आहे.