राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन
एमपीसी न्यूज – बदलापूर येथे बालिकेवर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन केल्याप्रकरणी तेथील आंदोलनकर्त्यावरील गुन्हे त्वरित मागे ( Pimpri) घेण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आंदोलन करण्यात आले.माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
इम्रान शेख म्हणाले, मतांसाठी लाडकी बहिणचे नाटक नको तर बहिणीला सुरक्षा हवी आहे. बदलापूरचे आंदोलन राजकीय ( Pimpri) होते आंदोलक हे बाहेरचे होते, हे सत्ताधाऱ्यांचे वक्तव्य बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची वकीली करण्यासारखे वाटले. बदलापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या 3000 हजार लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यांना अटक केली. लाठीचार्ज केला.येत्या 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनात उतरणार आहे कुणाकुणाला अटक कराल असा सवाल त्यांनी सरकारला केला.सरकारने त्वरित आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली.
Sharad Pawar : …जे घडलं त्याची गांभीर्याने नोंद सरकारनं घेतली पाहिजे- शरद पवार
यावेळी बोलताना अजित गव्हाणे म्हणाले “महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकार यावर अंकुश ठेवण्यास अपयशी ( Pimpri) ठरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच महायुतीचे नेते बदलापूर आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे असे सांगून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. बाहेरून आणलेल्या लोकांनी बदलापूर येथे आंदोलन केले.हा विरोधकांचा कट आहे.प्रकरण घडल 12 तारखेला.FIR झाली 18 तारखेला.इतक्या दिवस पोलिस प्रशासन आणि राज्य महिला आयोग झोपा काढत होते का..? की, 15 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलापूर दौऱ्यावर होते.त्यामुळे हे प्रकरण सरकारी दबाव आणून दाबण्यात आले का..? पिडीतेची तक्रार घेताना पोलीस प्रशासनाने 12 तास त्यांना पोलीस स्टेशनला बसवून घेतले. एकीकडे तुम्ही म्हणता की,लाडकी बहिण योजनेला विरोध करण्यासाठी विरोधक याचे भांडवल करत आहेत.अस असेल तर यापुढे राज्यात घडणाऱ्या कोणत्याच लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांवर विरोधकांनी काहीच बोलायचं नाही का..? सत्ता वाचविण्यासाठी तुम्ही अत्यंत असंवेदनशिलतेने वागत आहात,हे या राज्यातील जनता पाहत आहे.याच उत्तर तुम्हाला येत्या निवडणुकीत व्यवस्थित मिळेल यात काही आता शंका राहिली नाही,हे मात्र निश्चित.
कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, युवकचे कार्याध्यक्ष सागर तापकीर,प्रदेश संघटक संदीप चव्हाण,वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, असंघटित कामगार प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मयुर जाधव, प्रदेश सचिव के.डी. वाघमारे,प्रदेश सचिव ऍड.अमोल गव्हाणे, माजी नगरसेवक पंकज भालेकर,माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे,माजी नगरसेविका प्रियंका बारसे,माजी नगरसेविका संगीता ताम्हणे,रेखा मोरे, कविता कोंडे,ओबीसी सेल विशाल जाधव,भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष ॲड.संतोष शिंदे,चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष मेघराज लोखंडे,राजेश हरगुडे, सचिन निंबाळकर,रजनिकांत गायकवाड, नियामत शेख,नितीन शिंदे,राजेश लष्करे,किरण दनाने,अनिल गायकवाड, सुधीर कांबळे,हनीफ अत्तार,शाहिद शेक,डॉ.विशाल धस,गणेश भांडवलकर, सार्थक बाराथे,शिवम केंगार,आदर्श बनसोडे, यश लोंढे,शाकिब शेख अवधूत कदम,जयेश गौरकर,शुभम सावरकर,आलोक गवळी,आशिष खत्री,दीप अंब्रे,शुभम सातपुते,कार्तिक कदम, साहिल भिंगारडे,देवांग भिंगारडे व इतर सर्व पदाधिकारी,सदस्य,तसेच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या ( Pimpri) संख्येने उपस्थित होते.