एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तरुणाला (Thergaon)कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे ही घटना शुक्रवारी (दि.23) पहाटे थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी तुषार दीपक भंडारे (वय 28 रा पिंपरी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अविनाश नलावडे, निलेश कांबळे व त्यांचा मित्र कान्हा या तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Alandi : गाडी शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधमास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी देशी दारू का पितो असे म्हणाला असता त्याचा जाब विचारण्यासाठी आरोपी गेले. तेथे त्यांनी शिवीगाळ करत फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच लोखंडी कोयता डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.