एमपीसीन्यूज -आळंदी शहरात (Alandi)देहूफाटा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आले होते. हे शिबीर 28 जुलै ते 30 जुलै पर्यँत आयोजित करण्यात आले होते. शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण हे याचे आयोजक होते.या शिबिरात सहभागी झालेल्या भगिनींनी आज दि. 24 ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
Pimpri : एच. ए. मजदूर संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा शहराबाहेरील खासदार; प्रा.मेधा कुलकर्णी यांची निवड
यावेळी भाग्यश्री गावडे, अनुराधा जाधव,श्रीदेवी बिरादार, भाग्यश्री वाघमोडे, शारदा धनघाव, संगीता दाभाडे, बबीता शिंदे,मीना ढवळे, गंगाबाई घनघाव, शैला सातपुते,सरस्वती खोडसे,सुरेखा बिरादार ,सुनीता जाधव, सुरेखा बहिर,सपना लवटे,महेक शेख,सायरा शेख समवेत रोहिदास कदम ,विनायक महामुनी ,किशोर देशपांडे उपस्थित होते.