एमपीसी न्यूज – चाकण पोलिसांनी एका(Chakan ) सराईत वाहन चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून सहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) करण्यात आली.
विकास हरिभाऊ आगरकर (वय 32, रा. आगरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस परिसरात गस्त घालत असताना एक दुचाकीस्वार पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ती दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले.
Pune : दहीहंडी उत्सवानिमीत्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल
पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे आणखी तपास केला असता त्याने सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील पाच दुचाकींबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून एका दुचाकीच्या मालकाचा शोध सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाथा घारगे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर, नामदेव तलवाडे, सहाय्यक फौजदार संतोष सुपेकर, पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, शिवाजी चव्हाण, ऋषीकुमार झनकर, राजू जाधव, नवनाथ खेडकर, सुनील शिंदे, दीपक हांडे, सुदर्शन बर्डे, अलका भोसले, महेश कोळी, नितीन गुंजाळ, सुनील भागवत, रेवनाथ खेडकर, शरद खैरनार, माधुरी कचाटे यांनी केली.