Explore

Search
Close this search box.

Search

May 23, 2025 5:33 pm

MPC news

Pune : दहीहंडी उत्सवानिमीत्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पुणे शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव (Pune)सोमवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेत पुणे वाहतूक विभागाने काही मार्गांवरील वाहतूक वळवली आहे. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.

शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर सायंकाळी 5 पासून दहीहंडी फुटे पर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदीर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक (बाबु गेणु चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ इत्यादी ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यावेळी या रस्त्यांवर कोठेही वाहतूकीची कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी सोमवारी सायंकाळी पाच पासून खालील मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे.

Pune : गणेशोत्सव मंडळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवा – चंद्रकांत पाटील

शिवाजीरोड वरुन स्वारगेटला जाणेकरीता स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळकरोडने / शास्त्री रोडने इच्छित स्थळी जाता येईल.

पुरम चौकातुन बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी. रोडने इच्छित स्थळी जातील. तसेच सणस पुतळा चौकामधुन सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जातील.

स.गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

बुधवार चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.

रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत असून पर्यायी मार्गाचा वापर करावा.

सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील.

शिवाजी रोडवरुन जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलकडे जाणारी वाहतूक हि गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक पवळे चौक जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाईल.

गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक दारुवाला पुल येथून बंद राहिल. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.

 

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर