Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 6:43 pm

MPC news

Today’s Horoscope 25 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 25.08.2024.

शुभाशुभ विचार- भद्रा वर्ज्य.

आज विशेष- भानु सप्तमी.

राहू काळ – सकाळी 4.30 ते 6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र- भरणी 16.45 पर्यंत नंतर कृत्तिका.

चंद्र राशी- मेष 22.30 पर्यंत नंतर वृषभ.
—————————–
मेष- (शुभ रंग- निळा)
आज तुमचे मनोबल उत्तम राहील. प्रत्येक काम तुम्ही सकारात्मक पणे कराल. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्याल. आज तुमचे वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण असेल.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
आज काही दूरचे नातलग संपर्कात येतील. तुम्हाला काही अत्यावश्यक देणी चूकवावी लागतील. आज तुम्हाला भडस्तपणाबाई काही खर्च करावा लागणार आहे

मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज व्यावसायिक मंडळींना पैसा कमवण्याचे विविध मार्ग सुचतील. तुमचे राहणीमान उंचावेल. मित्र दिलेला शब्द पाळतील. बरेच दिवसापासून चे स्वप्न पूर्ण होईल.

कर्क ( शुभ रंग- आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी बिनचूक काम करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज वरिष्ठांच्या काही प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहेत. वडिलांचे सल्ले विचारात घेणे हिताचे.

सिंह ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
उद्योग व्यवसायात काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतील. हाताखालच्या लोकांकडूनही गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. ज्येष्ठांनी उपासना वाढवावी.

कन्या (शुभ रंग- गुलाबी)
फक्त नाकासमोर चालण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कोणत्याही नव्या उपक्रमाची सुरुवात मात्र आज नको. झटपट लाभाचा मोह टाळा. मर्यादेबाहेर आर्थिक धाडस नको.

तूळ (शुभ रंग- जांभळा)
आज समोर येणाऱ्या व्यक्तीवर तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल. कौटुंबिक जीवन सौख्यपूर्ण असेल.

वृश्चिक ( शुभ रंग- मोरपंखी)
ध्येयामागे धावत असताना तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आज थोडी विश्रांतीही गरजेची आहे. काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील.

धनु (शुभ रंग- पिस्ता)
आज स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण असेल. आज प्रकृती उत्तम साथ देईल. संततीकडून सुवर्ता येतील.

मकर (शुभ रंग- गुलाबी)
उत्साह पूर्ण दिवस आहे. वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे कार्यक्षेत्रात यशाची कमान चढतीच राहील. घरात कुटुंबीयांमध्ये सुसंवाद असेल.

कुंभ ( शुभ रंग- हिरवा)
आज जवळपासच्या प्रवासात झालेल्या ओळखी भविष्यकाळात कामी येतील. आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य वापर करा इतरांना सल्ले देण्यात वेळ वाया घालवू नका.

मीन (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमची आर्थिक बाजू बळकट असेल. तुम्ही हाती घेतलेले प्रत्येक काम सकारात्मकतेने पार पाडाल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्याल आज शब्दांचा वापर जपूनच करा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर