एमपीसी न्यूज – घराच्या बेडरूम मध्ये ठेवलेले (Wakad) तब्बल सव्वातीन लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरीची घटना 5 ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीत वाकड येथे घडली आहे.
याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.24) अंकुर सुभाष सक्सेना (वय 44 रा वाकड) यांनी फिर्यादी आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरा वीरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sangvi : रस्ता ओलांडत असताना कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू, कार चालकास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील मास्टर (Wakad) बेडरूम मध्ये लाल रंगाची पर्स होती. त्या पर्स मधून 75 ग्राम वजनाचे तीन लाख तीस हजार रुपयांचे दागिने चोरणे चोरून नेले आहेत. चोरी उघडकीस येतात फिर्यादी यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाकड पोलीस चोराचा शोध घेत आहेत.