एमपीसी न्यूज : – मावळ भाग व धरण (Alandi) क्षेत्र भागात होत असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. काल दि.26 रोजी सकाळ नंतर परत हळूहळू पाण्यात वाढ होऊन भक्ती सोपान पुल पाण्याखाली गेला. तसेच अद्याप पर्यंत तो पाण्याखाली असून भक्त पुंडलिक मंदिराचा काही भाग पाण्याखाली आहे.
Talegaon Dabhade : साहित्यिक पांडुरंग भानुशाली यांचे निधन
तेथील दगडी घाटावरून मोठ्या प्रमाणात नदी पात्राचे पाणी वाहत आहे. सिद्धबेट जुन्या (Alandi) बंधाऱ्यावरून तसेच चाकण चौक पूला शेजारील बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते. इंद्रायणी नदी दुतर्फा दगडी घाट बहुतांशी पाण्याखाली गेला आहे.